अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांना सुरक्षित अन्न,निरोगी महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अत्यंत कडक केली आहे, याची कडक नियमावलीच आता मुंढे यांनी जाहीर केल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत, 23 जून रोजी पारित झालेल्या या नव्या नियमानुसार खालील नियम बंधनकारक असणार आहेत
– हॉटेल चालकांकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे
– प्रत्येक ग्राहकाला पिण्यायोग्य सुरक्षित व मोफत पाणी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे, तसा फलक लावण्याचे आदेशही दिले आहेत
– व्हेज-नॉनव्हेज किचन व्यवस्था स्वतंत्र असणे बंधनकारक केले आहे
– हॉटेलमध्ये स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे
– कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक केले आहे
-नियमित पेस्ट कंट्रोल करणे अनिवार्य आहे
-कच्चा माल आणि तयार अन्नासाठी स्वतंत्र विभाग असणे बंधनकारक आहे
-एकदा तळलेले तेल पुन्हा वापरता येणार नाही
नियम न पाळणाऱ्या हॉटेल व्यावसायीकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.








