संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

नवी औद्योगिक क्रांती होताना जग जवळ येतय रोबोट्‌‍स व AI मुळे 30 कोटी नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त होतेय

SHARE:

एका बाजूला विविध आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग प्रचंड जवळ येतंय, यामुळेचं संपूर्ण जग नव्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करताना दिसतेय, याचाच एक भाग म्हणून कमी काळात लोकप्रिय ठरलेल्या चॅट जीपीटी (Chat GPT) या मायक्रोसॉफ्टच्या AI टूलला जागतिक स्पर्धा म्हणून गुगलनेही आता चॅट बार्ड (Chat Bard) तर मेटा ने ब्लेंडर बॉट (Blender Bot) आणि चायनाने चॅट बॉट इन (Chat Boat Ernie) असे विविध AI टूल जगासमोर ठेवले आहेत. याचा सध्यातरी जगालाही प्रचंड फायदा होताना दिसून येतो आहे तर दुसऱ्या बाजूला याचा झपाट्याने होत असलेला वाढता प्रभाव पाहून चिंताही व्यक्त होत आहे. जागतिक औद्योगिक क्षेत्रात AI व रोबोटच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होताना दिसत आहे. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते पुढील 10 ते 20 वर्षात अमेरीकेमध्ये निम्याहून अधिक कामगारांची जागा मशीन्स अथवा AI ने घेतलेली असेल, तसेच कलाकार, आयटी इंजिनिअर्स यासारख्यांच्या विविध क्षेत्रात कित्येक नोकऱ्या संकटात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यातून अंदाजे 30 कोटींच्या आसपास नोकऱ्यांना भविष्यात धोका पाहोचू शकतो अशीही चिंता समोर येताना दिसत आहे.
अशीच भीती प्रिंटींग प्रेसचा शोध लागला तेंव्हा किंवा कॉम्प्युटर अन्‌‍ फोनचा शोध लागला तेंव्हाही व्यक्त केली गेली होती. तेंव्हाही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, परंतु ज्यांनी या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतले त्यांच्या नोकऱ्या मात्र सेफ झाल्या होत्या असाही अनुभव आहे. त्यामुळे आत्ताच्या या AI व रोबोटच्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपणही या तंत्रज्ञानाचा स्विकार करुन त्यासोबत आपला विकास साध्य करायला हवा, या औद्योगिक क्रांतीचा प्रचंड मोठा प्रभाव विकसनशील देशांवर होईल असाही अंदाज व्यक्त होत आहे. जगाने मागील औद्योगिक क्रांतीचा अनुभव घेवून आपल्या आजच्या शिक्षण पध्दतीत योग्य तो बदल करुन नवीन AI टूल व रोबोटिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करून आधुनिक शिक्षण पध्दती विकसीत करण्याची गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीही त्यांच्या एका भाषणात भारत AI साठीचा वैश्विक हब बनला पाहीजे मात्र जगाला AI टूलच्या दुरुपयोगापासून दूर ठेवणेही नितांत गरजेचे आहे. ही जगाची सार्वत्रिक जबाबदारी आहे असे म्हटले होते. पुढील 10 ते 20 वर्षात AI व रोबोटस्‌‍चा आपल्यावरील प्रभाव नक्कीचं आणखी वाढणार आहे, परंतु याला घाबरुन न जाता या तंत्रज्ञानाचा बारकाईने अभ्यास करुन आधुनिक तंत्राशी नाते जोडणे गरजेचे आहे, असे झाल्यास AI व रोबोट हे तंत्रज्ञान शाप ठरणार नाही तर नक्कीचं ते वरदान ठरेल यात शंकाचं नाही.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment