संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

गणेश ताठे यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागारमंडळाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) निवड

SHARE:

कारेगांव : कारेगांवचे भूषण आणि शिरुर तालुक्याचे सुपूत्र भाजपाचे युवा नेते गणेश लक्ष्मणराव ताठे यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असल्याने विशेष महत्व आहे. ताठे गेल्या
अनेक वर्षांपासून भारतीय जनता पाटत एक सक्षम व प्रभावी नेते म्हणून कार्यरत आहेत. संघटना उभारणीत आणि विस्तारीकरणात ताठे यांचा नेहमीच महत्वाचा सहभाग राहीला आहे. याबळावरचं पक्षाने त्यांना यापूव भारतीय जनता पाट कामगार मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी दिली होती,
ही जबाबदारी देखील ताठे यांनी अत्यंत प्रभावीपणे पेलली आहे, याचीच पावती म्हणून त्यांना आता ही मोठी संधी मिळाली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना ताठे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, माझ्या नेत्यांनी माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी नक्कीचं सार्थ ठरवील आणि कामगार
हितासाठी माझ्याकडून जेवढे योगदान देता येईल ते नक्कीच यापुढे मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment