संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

साप दिसल्यास डिवचू नका तो लगेच निघून जाईल, सर्ममित्रांना संपर्क करा, त्याला पकडणे सोपे होईल

SHARE:

भारतात सापाच्या सुमारे 340 प्रकारच्या जाती आहेत, यापैकी सुमारे 69 जाती या विषारी मानल्या जातात. त्याचबरोबर महाराष्ट्रात सापांच्या सुमारे 52 जाती असून यापैकी 12 जाती विषारी आहेत. वास्तविक पाहता साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्याची ओळख आहे. आपण सापाला पूजनीय मानतो, परंतु साप दिसल्यानंतर त्याला मारण्यासाठी सरसावतो. म्हणूनचं सापांबद्दलचे असंख्य गैरसमज दूर होणे गरजेचे आहेत. यासाठी अनेक सर्पमित्र नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
वास्तविक पाहता साप दिसल्यानंतर आपण शक्यतो घाबरुन जात त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. साप हा त्याची वाट शोधत आपला प्रवास करीत असतो, त्यामुळे त्याच्या प्रवासात जर आपण अडथळा ठरलो नाही तर तो त्याच्या वाटेने त्वरीत निघून जातो, साप कधीचं एका जागेवर थांबत नाही, तो गतीने निघून जात असतो.
वास्तविक पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी वारंवार साप दिसून येतात, पण अशावेळी न घाबरता त्याला त्याच्या वाटेनं जावू द्यावं, त्याला विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करु नये. सापापासून किमान 15 ते 20 फुटांचे अंतर ठेवावे हे अंतर आपण राखून ठेवले तर सापालाही आपली भीती वाटणार नाही आणि तो आपल्यावर हल्ला करणार नाही. आपल्यासमोर साप आल्यास त्याला लगेच हात लावण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करु नका. तातडीने सर्पमित्रांना फोन करा, ते आपल्या स्थानापर्यंत येईपर्यंत साप कुठे जातो आहे, कुठे थांबतो आहे याकडे लक्ष द्या, सर्पमित्र आल्यानंतर त्याला एका विषिष्ट पध्दतीने तातडीने कैद करुन मोकळ्या रानात सोडून देतील.
प्राणी कोणताही असो माणूस असो की साप आपल्यावर हल्ला होतोय किंवा आपल्याला काहीतरी धोका आहे असे लक्षात आल्याशिवाय तो आपल्यावर हल्ला करीत नाही, त्यामुळे साप दिसल्यावर कधीही त्याला मारण्याचा प्रयत्न करु नये. शेवटी तोही प्राणी आहे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे.

साप आढळल्यास आपण खालील सर्पमित्रांना संपर्क करु शकता..

शिरुर तालुक्यातील सर्पमित्र – योगेश परदेशी मो. 9028259699, निलेश पाठक मो. 9822336235,

शिक्रापूर – शेरखान शेख मो. 9822698386, अमोल कुसाळकर मो. 9097909096,

तळेगाव ढमढेरे – गणेश टिळेकर मो. 9960516366,

सणसवाडी -बाळासाहेब मोरे मो. 9822145717,

कान्हुर मेसाई – रमण खोमणे मो. 9112836642,

कारेगाव / रांजणगाव – नितीन वाळिंबे मो.9588484752,

वडगाव रासाई – गोविंद शेलार मो. 9922986263.

तांदळी – सुनील कळसकर मो. 9595949104.

मांडवगण फराटा – मनोज चौधरी मो. 9765617410.

कोरेगाव भीमा – आकाश कांबळे मो.8975152858.

टाकळी हाजी – सागर गारे मो. 9889700364,

कोंढापुरी – रामेश्वर ढाकणे मो. 9284749140.

वरुडे – विक्रम धरणे मो. 9284986318,

जातेगाव बुद्रुक- वैभव निकाळजे 8605348673.

कवठे येमाई – गणेश जोशी मो. 9960534522,

मलठण – योगेश वेताळ मो. 9075731199.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment