संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

पावसाळ्यात काळजी घ्या पचनसंस्था विक होतेय जपून खा, विश्रांती घ्या मग प्रतिकारशक्ती वाढतेय

SHARE:

पावसाळ्यात जठराग्नी मंद झाल्याने साहजिकच भुक कमी होते, यामुळे जेवणही कमी जाते, अशक्तपणा जाणवतो, अशक्त पणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन शरीर अनेक आजारांना बळी पडते, म्हणूनचं पावसाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आता तर तीव्र उन्हाळा संपतानाच अचानक मोठ्या प्रमाणात सलग पाऊ स सुरु झाला आहे. यामुळे सद,पडसे, खोकला,अंगदुखी, मलेरीया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यु, चिकुन गुणिया, कावीळ, उलटी, जुलाब, कॉलरा, सांधेदुखी, आमवात, अस्थमा, पचनाचे आजार, आम्लपित्त असे विविध आजार सातत्याने डोके वर काढतात, त्यामुळे माणूस हैरान होवून जातो, या आजारांना बळ न मिळण्यासाठीचं पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे, पाणी उकळून प्या, पालेभाज्या फळे वापरताना ती मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत, उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, या दिवसात तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, बेकरी पदार्थ, साबुदाणा, मसालेदार, चमचमीत अन्न, फास्ट फुड असे अन्न आरोग्यास हानीकारण आहे. अति थंड पाणी पिणे, कोल्ड्रींक्स, आईस्क्रीम्स्‌‍ खाणे या दिवसात हानीकारक ठरते.
घरात बसलेले असताना बाहेर मुसळधार पाऊ स कोसळलेला पाहून अनेकदा चमचमीत खाण्याचा मोह होतो, मग भजी, वडापाव, एखाद्या हातगाडीवरील तोंडाला पाणी सुटणारे अन्न खाण्याची इच्छा होते, परंतु पावसाळ्यात या इच्छांना आवर घालणे अत्यंत महत्वाचे आहे. याचं दिवसात साथीच्या आजारांनाही बळ मिळत असल्याने आपण आपल्या पचनशक्तीचा अंदाज घेवून आपल्याला सहज पचणारे अन्नपदार्थ घरी करुनचं खावेत, ज्यामुळे आपल्याला सर्व आजारांपासून दूर राहता येईल. या दिवसात बाहेर वातावरण थंड असताना आपण सकाळी सकाळी घरीच प्राणायाम किंवा आपल्याला जमेल ते व्यायाम केल्यास आपली प्रतिकारशक्ती नक्कीचं स्ट्रॉग राहू शकेल, त्याचबरोबर आपली भुक वाढेल आणि भुक वाढल्याने अन्न लगेच पचनास मदत होईल. एकुणच पावसाळ्यात काळजी घ्या, आपले आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे.

पावसाळ्यात आपली पचनसंस्था कमकुवत बनते, आपल्या शरीरातील जठराग्नी मंदावतो, त्यामुळे या दिवसात शक्यतो हलके अन्नपदार्थ घ्यावेत. बाहेरील चमचमीत पदार्थ, तळलेले पदार्थ आणि उघड्यावरील अन्न टाळावे, घरच्या घरी पहाटे जमेल तसा व्यायाम करावा, आपल्या आवडते पदार्थ घरच्या घरीच बनवून खावेत, योगाभ्यास करावा, मनाला प्रसन्न ठेवावे, बाहेरील अन्न टाळावे. पुरेशी विश्रांती घ्यावी. लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment