शिरुर : शिरुरचे भूमीपूत्र डीवायएसपी / एसीपी विक्रम कदम यांच्या प्रभावी कार्यशैलीमुळे त्यांच्या खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने कोकण विभागातील
सर्वोत्कृष्ट पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळविल्याने कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता, या अंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या विविध विभागांची पडताळणी केली होती, या पडताळणीत कोकण विभागातील
सर्वोत्कृष्ट उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय म्हणून विक्रम कदम यांच्या रायगड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. यानिमित्त रायगड जिल्ह्याच्या एस.पी आंचल दलाल यांच्या हस्ते विक्रम कदम यांचा नुकताच रायगड येथे गौरव करण्यात आला आहे. ही शिरुरकरांच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची बाब आहे.








