संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

निवडणुकीच्या हालचालीने इच्छुक लागले तयारीला, प्रभाव टाकण्यासाठी गळ घालताहेत नेत्याला नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद इच्छुकांची संख्या वाढली काय होणार, कोण लढणार, उत्सुकता प्रत्येक कार्यकर्त्याला

SHARE:

सुप्रीम कोर्टाने सप्टेंबरच्या आत निवडणुका घ्या, असा आदेश निवडणुक आयोगाला दिल्याने आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरात लवकर होणार अशी खात्री झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना आता वेग आला आहे, शिवाय आपापल्या भागात प्रभाव टाकण्यासाठी व तिकीट पक्के करुन घेण्यासाठी स्थानिक पुढारी व वरिष्ठ नेत्यांना इच्छुकांकडून गळ घातली जात असल्याचे चित्रही ठिकठिकाणी अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे साहजिकच निवडणुकीच्या हालचालीने इच्छुक लागले तयारीला, प्रभाव टाकण्यसासाठी गळ घालताहेत नेत्याला, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद इच्छुकांची संख्या वाढली, काय होणार, कोण लढणार, उत्सुकता प्रत्येक कार्यकर्त्याला अशी काहीशी परिस्थिती आता शिरुर-हवेली व शिरुर-आंबेगांव विधानसभा मतदारसंघातून अनुभवायला मिळत आहे एवढे मात्र निश्चित !
वास्तविक पाहता 2016 साली शिरुर नगरपरिषदेची निवडणुक झाली होती, यानुसार 2021 सालीचं नगरपरिषदेची मुदत संपली होती, त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकही 21 मार्च 2017 रोजी पार पडली होती, यानुसार 2022 मध्ये याचीही मुदत संपली होती, यानुसार नगरपरिषदेला तब्बल 4 वर्षे नगरसेवक नाहीत तर 3 वर्षे झाले जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नाहीत, यामुळे साहजिकच त्या त्या भागातील विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे, सत्ताधारी नगरसेवकांची, जिल्हा परिषद सदस्यांची तसेच नगररसेवकांची नावेही कदाचित आता मतदार विसरले असतील इतका मोठा हा कार्यकाल आहे, म्हणूनचं लवकरात लवकर निवडणुक व्हावी आणि त्या त्या भागातील विकासाला गती मिळावी अशी मतदारांचीही भावना होती. आता मात्र
निवडणुकांच्या हालचाली सुरु झाल्याने प्रचंड मोठ्या विश्रांतीनंतर आता पुन्हा इच्छुक आपापल्या भागात आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागले आहेत, मोठ्या कालखंडानंतर बरीच राजकीय समीकरणेही आता शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात बदलली आहेत, विधानसभा निवडणुकीपूव माजी आमदारांकडून आपल्याला तिकीट मिळणे अशक्य आहे, अशी भीती मनात बाळगणाऱ्यांनी जोमाने आमदार माऊ ली कटके यांना भक्कम साथ दिली, त्यामुळेचं विक्रमी मतांची आघाडी घेत कटके यांना सत्तेची संधी मिळाली, त्यामुळे साहजिकच आता जे आधी सत्तेत होते त्यांच्यासह इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या समोर आहे. कटके यांच्या दृष्टीने पुन्हांदा जिल्हा परिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आता राजकारण सोयीचे झाले आहे, पण इच्छुकांच्या संख्येपुढे तिकीट नक्की कुणाला द्यावे हा प्रश्न त्यांच्यासमोर असणार आहे. नगरपरिषदेत गेली अनेक वर्षे जगप्रसिध्द उद्योजक प्रकाशशेठ धारीवाल यांची सत्ता आहे, पण धारीवालांनी विधानसभेला माजी आमदार अशोक पवार यांना साथ देत शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाला ताकद दिली होती, त्यामुळे अजितदादा पवार या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभा करण्यासाठी आग्रह धरतील का ? माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यामुळे ती पोकळी महायुतीच्या निमित्ताने आमदार कटके भरुन काढत नगरपरिषदेत आपला पॅनेल उभा करण्यासाठी पुढाकार घेतील का ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे, त्यामुळे नक्की पुढे काय घडणार ? कोणती राजकीय समीकरणे पुढे येणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

त्या त्या भागातील ज्या स्थानिक पुढाऱ्यांनी जोमाने महायुतीचे काम केले, त्यातील बहुतांश इच्छुकांना आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची उमेदवारी हवी आहे, समोर पॅनेल कुणाचाही असो, पण मी लढणारचं अशी भूमिका नगरपरिषदेची निवडणुक लढविण्यासाठी आग्रही असलेल्या भावी नगरसेवकांनी घेतली आहे. यावेळी शिरुर-हवेली विधानसभेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा गटाकडे आहे. शिवाय सध्या तालुक्यातील विविध सत्ताकेंद्रे राष्ट्रवादीकडे असल्याने आपले जिल्हा परिषद,पंचायत समितीवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच शिरुर नगरपरिषद काबीज करण्यासाठी नक्कीचं मोठ्या हालचाली होणार ओहत एवढे मात्र नक्की

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment