संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

वाढत्या स्पर्धेमुळे शाळांचा दर्जा सुधारतोय गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे कल वाढतोय पालक जागृक होतोय,विद्यार्थ्यांचा कल आधुनिक शिक्षण पध्दतीकडे झुकतोय !

SHARE:

शिरुर शहरात पूव चांगले शिक्षण घेण्यासाठी ठराविक शैक्षणिक संस्थांची मक्तेदारी होती, त्यामुळे पहाटे रांगा लावून प्र्रवेश घेतले जायचे, हा शिरुरचा इतिहास आहे, पण आता काळ बदललाय, आता अनेक चांगल्या शिक्षण संस्था शिरुर शहरात उभ्या राहील्या, त्यामुळे साहजिकच शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली, याचं वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे आता शाळांचा दर्जाही नक्कीचं सुधारताना दिसतो आहे, किंबहुना गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडेही आता कल वाढताना दिसतोय, पालक जागृक होताहेत आणि विद्यार्थ्यांचा कलही आधुनिक शिक्षण पध्दतीकडे झुकतोय अशी एकंदरीत इथली शैक्षणिक क्षेत्रातील पार्श्वभूमी असल्याने शिरुर शहरात चांगले शिक्षण घेण्यासाठी आता शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले पर्याय समोर आले आहेत, त्यामुळे पालकांनाही प्रवेशासाठी मनासारखा चॉईस असल्याने पुण्या-मुंबईच्या दर्जाचे सर्वोत्तम शिक्षण आता शिरुरमध्येच मिळत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती झाल्याचे चित्र तालुक्यासह शहरातून सर्वत्र अनुभवायला मिळत आहे ही मोठी समाधानाची बाब आहे.
वास्तविक पाहता सध्या शिरुर शहरात ज्ञानगंगा विश्व विद्यालय, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानप्रबोधिनी व ज्ञानगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेले गुरुकुल शिक्षण पध्दतीचे स्कूल, पुण्यातील प्रसिध्द डेक्कन एज्युकेशन सोयायटीचे इंग्लीश मिडीयम ॲण्ड सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल, पोद्दार स्कूल, व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, विजयमाला, सेंट जोसेफ स्कूल अशा विविध शैक्षणिक संस्था आता जोमाने विकसीत होत आहेत, किंबहुना चांगले शिक्षण देण्यासाठी विशेष पुढाकार घेताना दिसून येत आहेत.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात अध्यापनाचे धडे देणाऱ्या प्रा.डॉ.राजेराम घावटे सरांनी त्या काळात अर्थातच 2018 मध्ये गंगा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे-मुंबई सारखे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ज्ञानगंगा विश्व विद्यालय, न्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स आणि ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल या विभागाची स्थापना केली. आज या संस्थेत 5 हजार विद्याथ शिक्षण घेत आहेत. भारतीय परंपरेचा प्राचीन वारसा आजच्या काळातही सुरु ठेवण्याच्या उदात्त हेतूने ज्ञानगंगा गुरुकुल या संस्थेने आजच्या काळात आपल्याकडे अभावानेच आढळणारी 12 तासांची शिक्षण पध्दती सुरु केली, या ठिकाणी विविध आधुनिक विषयांची कास धरुन योग्य करीअरसाठी परिपूर्ण शिक्षण दिले जाते. परिपूर्ण विद्याथ घडविणे हाच ध्यास समोर ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशीही संस्था आहे, प्रत्येक वर्गात डिजिटल क्लासरुम,ए आय रोबोटीक कोडींग, विविध क्रिडा प्रकारांसाठी सुसज्ज क्रिडांगण, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यासाठी स्वतंत्र अत्याधुनिक प्रयोगशाळा इथे उभ्या आहेत, शिवाय इथे स्वतंत्र संगणक कक्ष, मॅथ लॅब्स्‌‍ देखील उपलब्ध आहे.
अत्यंत उच्च विभूषीत शिक्षकवर्ग इथे आहे, शिवाय युपीएसस्सी, एमपीएस्सी, एम.एच.टी.सीईटी या विभागातील विद्यार्थ्यांनाही इथे योग्य मार्गदर्शन दिले जाते. अतिरिक्त मार्गदर्शन करण्यासाठी उच्चपदस्थ अधिकारी, विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याने येथील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीचं वाढत आहे. सीबीएसई शिक्षण पध्दतीत देखील इथे कलात्मक व आधुनिकतेचा संगम साधण्यात आला आहे. इथल्या विद्यार्थ्यांनी यंदा राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळविला आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लीश ॲण्ड सेमी इंग्लीश मिडीयम स्कूल मध्येही अत्यंत दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. बाबुराव नगर येथील प्रशस्त जागेत ही शाळा उभी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच इथे प्रशस्त 4 एकरमध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान उभे करताना इथे फुटबॉल, डॉजबॉल, हॉलिबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डी आदि महत्वाचे खेळही सर्वोत्तम प्रशिक्षकामार्फत शिकविले जात आहेत. सन 2022 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इथे कृतीयुक्त शिक्षण, व्यावसायीक दृष्टीकोण, क्षमता वृध्दी, संशोधन आदि शिक्षण पध्दतीचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर इथे संगीत, अबॅकस, हार्मोनियम, तबला, पखवाज, शास्त्रीय गायन आणि मल्लखांब प्रशिक्षण आदिंचेही शिक्षण दिले जात आहे. इथे सध्या प्रि-प्रायमरी ते 5 वी सेमी इंग्रजी माध्यम स्टेट र्बोर्ड व प्रि-प्रायमरी ते 10 वी इंग्रजी माध्यम स्टेट बोर्ड अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. एकुणचं काय तर आता आधुनिक युगाबरोबर शाळांनीही आपल्यात मोठे बदल केले आहेत.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment