संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

तहसिलदार म्हस्के यांच्या विरोधात शिंदोडीचे शेतकरी आक्रमक, खोटे गुन्हे दाखल केल्याने घेतली महसूलमंत्र्यांची भेट !

SHARE:

शिंदोडी : शेतकऱ्यांची काहीही चुक नसतानाही शिंदोडी येथील शेतकऱ्यांवर शहानिशा न करताच शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी खोटे गुन्हे दाखल केल्याने येथील शेतकरी आक्रमक झाल्याने त्यांनी नुकतीच जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊ न तहसिलदार म्हस्के यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी या शिष्टमंडळात चिंचणीचे माजी सरपंच दादासाहेब पवार, शिंदोडीचे सरपंच अरुण खेडकर, इंद्रभान ओव्हाळ, इंद्रभान वाळुंज, गंगाराम माने तसेच इतरही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेत तातडीने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चाकशीचे आदेश दिले आहेत, अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणुक करणाऱ्या तहसिलदार म्हस्के यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिंदोडीतील शेतकऱ्यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment