संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

काळजी घ्या,जोडीदार निवडताना पाहू नका फक्त श्रीमंती, लग्न जमवताना स्वभाव नक्की पहा, नाते जुळवताना !

SHARE:

आयुष्य खुप सुंदर आहे, त्यामुळे हे सुंदर आयुष्य अधिक सुंदर होण्यासाठी प्रत्येक कॉलेज तरुण-तरुणी आपल्या स्वप्नातला तो जोडीदार अनेकदा इथेच घाई-घाईत शोधत असतो. तिला आवडणाऱ्या प्रत्येक मुलात, ती आपल्या स्वप्नातला राजकुमार पाहत असते, तर त्याला दिसणाऱ्या प्रत्येक सुंदर मुलीत तो आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीला अनुभवत असतो, म्हणूनचं कॉलेज जीवनातचं अनेक तरुण-तरुणींच्या हातून चुका घडत जातात, हे वयचं तस असतं, कोणत्याच जबाबदारीची जाणीव नसते, कोणतीचं कौंटुबिक जबाबदारी खांद्यावर नसते, ना असते कोणते टेंन्शन त्यामुळे मोकळ्या मनात प्रेमात पडण्याचे विचार प्रत्येकाच्या मनात चटकन शिरतात आणि मग इथूनच त्यांच्या स्वप्नांचा प्रवास सुरु होतो. तो किंवा ती या स्वप्नांच्या जगात हरवताना या दोघांनाही समाजाचे कोणतेही भान उरत नाही, कोणताही विचार त्यावेळी समोर येत नाही, फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रेम एवढचं त्यांचं जग असतं, म्हणूनचं सोळावं वरीस धोक्याचं असं पूवचे लोक म्हणायचे ते यासाठीचं, आजही या म्हणीला तितकचं महत्व आहे, कारण आजच्या या आधुनिक युगात तरुण-तरुणींना विचार स्वातंत्र्य आहे.
आई-वडील सुशिक्षित असल्याने घरातून मोकळीक मिळते, त्यामुळे आपण वागतोय ती प्रत्येक गोष्ट बरोबर आहे असा प्रत्येक तरुणाईचा समज असतो, यातूनचं मग प्रेमात पडण्याचं वेड समोर येतं आणि होत्याचं नव्हतं होवून जातं. म्हणूनचं मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात हगवणे कुटुबियांचं ज्वलंत उदाहरण समोर आहे. वैष्णवी हगवणे हिचं शशांक हगवणे याच्यावर प्रेम होतं, एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी शशांकच्या प्रेमात पडते, लग्न करते पण पदरात काय पडलं तर फक्त आणि फक्त छळवाद, तो श्रीमंत होता, पण माणूसकीप्रधान नव्हता म्हणूनचं तिचा बळी गेला. मित्रांनो, आयुष्य खुप मौल्यवान आहे, लग्न ही आयुष्यातील खुप मोठी घटना आहे, त्यामुळे इथे चुकीला माफी नाही, त्यामुळे विचार करुन निर्णय घ्या, आयुष्यभर साथ निभावताना एकमेकांचे एकमेकांशी विचार जुळणे महत्वाचे असते तरच संसार सुखाचा होतो, जुनी लोक स्थळ पाहताना खुप विचार करुन, सखोल चौकशीअंती लग्नगाठ जुळवायचे याच्या मागेही लग्न कायमस्वरुपी टिकणं हीच भावना होती, पण आजच्या आधुनिक युगात, एका दिवसात प्रेम आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकअप अशा अनेक घटना वारंवार बघायला मिळत आहेत, अशा या सोशल मिडीयाच्या जमान्यात आता मनासारखा जोडीदार हवा असेल तर माणूसकी आणि विचार पण तितकाचं महत्वाचा आहे, त्यामुळे जोडीदार निवडताना घाई नको, जिव्हाळ्याचा सहवास महत्वाचा आहे.

लग्न ही आयुष्यातील सर्वात महत्वाची घटना आहे, त्यामुळे इथे चुकलेला निर्णय आपल्याला अनेकदा विनाशाकडे घेऊन जातो, त्यामुळे जोडीदाराची निवड करताना फक्त श्रीमंती पाहू नका, त्याच्या फक्त असण्यावर, दिसण्यावर जावू नका, त्याचा स्वभाव, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचं समाजात असणारं स्थान, या गोष्टींचाही विचार होणे गरजेचे आहे. जो आपल्या सोबत आयुष्यभर राहणार आहे, त्याच्यावर फक्त प्रेम आहे म्हणून लग्न करणार असाल तर ही आयुष्यातील सर्वात मोठी चुक ठरु शकते याचाही विचार नक्की करा
लेखक – मदन काळे

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment