संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

वाहतुकीचा बेशिस्तपणा कधी थांबणार ? आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतोय कधी कळणार !

SHARE:

एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात गाडीचे स्टेरींग किंवा टू व्हिलरचा ॲक्सेलेटर स्पीड मात्र कंट्रोलमध्ये नाही, काहीतरी खरेदी करायचे आहे म्हणून कसलाही विचार न करता घाई-घाई दिली गाडी रस्त्यामध्ये लावून आणि बाबा गेला रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात खरेदीला, ट्रॅव्हल्सवाले, बसवाले यांच्याकडून रोजचं रस्त्यांवर पार्क केली जाणारी वाहने हे चित्र आता रोजचेच झाले आहे, यामुळे रोज कुठेना कुठे अगदी छोट्या छोट्या चुकांमधुन मोठे अपघात घडताना दिसून येतात, यातून कुणाचा तरी प्राण जातो किंवा कुणाला तरी जबरी इजा होताना दिसून येते, काहींना तर कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते, मला एक गोष्ट कळत नाही की असं वागून बेशिस्त वाहनचालकांना नेमकं मिळतं तरी काय ? आपला एक हलगजपणा कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो ही गोष्ट या महाशयांच्या लक्षात कशी येत नाही, म्हणूनचं आता प्रत्येकाने जागृतीसाठी पुढाकार घ्यायला हवा, आपल्याला शक्य होईल तिथे सुचना करण्याचे धाडस हवे, ऐकत नसेल तर सरळ फोटो काढा, पोलिसांना कळवा, रस्त्यांवर पार्क करणाऱ्यांना सतत दंड पडत राहीले की आपोआप शिस्त लागेलं, अनेकदा काही भागात रस्त्याच्या उलट्या दिशेने येणारी वाहने,अचानक मध्ये गाडी आडवी घालून घाईत जाण्याच्या प्रयत्नाने अडणारी वाहतुक,यामुळे होणारी मोठी कोंडी, रस्त्यावर कशीही पार्क होणारी वाहने हा वाहतुकीचा बेशिस्तपणा कधी थांबणार ? आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतोय कधी कळणार ? अशी आर्त हाक देण्याची आता वेळ आली आहे.एवढे मात्र निश्चित, या शिस्तीसाठी आता प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा.

वाहन चालवताना प्रत्येकाला प्रचंड घाई आहे, मान्य आहे आपल्याला वेळेत पोहोचायचे आहे, पण त्यावर उपाय म्हणून आपण अर्धा तास लवकर निघू शकतो, पण आपल्या आतताईपणामुळे कुणाचा तरी प्राण जावू शकतो, आपलाही जीव धोक्यात येऊ शकतो याचाही विचार होणे गरजेचे आहे. आपण लवकर पोहोचलो म्हणून कुणी पुरस्कार देणार नाही, किंवा उशीर झाला म्हणून फासावरही लटकावणार नाही, पण त्यासाठी शिस्त तोडून इतरांना त्रास होईल असे वागणे चुकीचे आहे, आपण सकाळ पासून रात्रीपर्यंत वाहतुकी संदर्भात किती चुका करतो याचेही आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment