संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

शिरुर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अस्थापनेस मंजूरी मिळणेबाबत अजितदादांना प्रस्ताव – ॲड.अमित खेडकर

SHARE:

शिरुर : आपल्या शिरुर (घोडनदी) न्यायालय येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरच्या आस्थापनेस मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी मंजूरी देऊ न सदरचा प्रस्ताव प्रिंन्सीपल सेक्रेटरी विधी न्याय शाखा महाराष्ट्र शासन,मंत्रालय येथे कोर्ट व स्टाफच्या पगाराचे तरतुदीसाठी पाठविला आहे याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर व स्टाफच्या पदांकरीता आर्थिक निधी मंजूरीसाठी चर्चा केली आहे, या मागणीची अजितदादांनी तातडीने दखल घेऊ न लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती शिरुर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अमित खेडकर यांनी दिली आहे. यावेळी बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे मा.चेअरमन व आळंदी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्रजी उमाप तसेच उपाध्यक्ष ॲड.यमराज शिंदे, ॲड.अतिष लांडगे, ॲड.किरण आंबेकर, ॲड.सतिश गवारी, ॲड.निनाद मगर, पुणे बार असोसिएशनचे सचिव ॲड.पृथ्वीराज थोरात, तसेच वकील संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment