संवाद वाहिनीचा पुढील अंक – 6 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 4 सप्टेंबर 2026

परप्रांतीय तरुणीवर सामुहीक अत्याचाराने शिरुर हादरले सात जणांविरुध्द गुन्हा दाखल मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले

SHARE:

मोठ्या पगाराची नोकरी देण्याच्या बहाण्याने एका परप्रांतीय तरुणीला बोलावून तिला दोन दिवस लॉजमध्ये ठेवून सामुहीक अत्याचार केल्याप्रकरणी शिरुर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत 22 वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार दिपक श्रीमंदिलकर (रा.जुने शिरुर,ता.शिरुर), अजय माणिक घेगडे (रा.माठ, ता.श्रीगोंदा), दिपक दत्तात्रेय भोसले व अनिकेत दिलीप पठारे (दोघेही रा.मावळेवाडी,.ता.पारनेर), ऋषिकेश रामदास ढवळे व सागर राधू ढवळे (दोघेही रा.ढवळगांव,ता.श्रीगोंदा) व इतर एक अनोळखी इसम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि.19 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शिरुर येथील मार्व्हल इन लॉजवर नेवून नशा येणारी पांढऱ्या रंगाची पावडर खाण्यास देवून तिच्यावर वरील आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केले. याची माहिती पिडीतीने पोलिस मदत नियंत्रण कक्षाच्या 112 या क्रमांकावर दिल्याने पोलिस निरीक्षक विनोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या पथकाने संबंधीत लॉजवर जावून तरुणीची सुटका केली तसेच पिडीतीने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्याचाराच्या घटनेनंतर संबंधीत तरुण फरार झाले असून पोलिस पथकाकडून त्यांचा शोध सुरु आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीवर अशा पध्दतीने सामुहीक अत्याचाराची घटना घडल्याने शिरुर शहर हादरले आहे. सध्या तरुणाईच्या बेरोजगारीचा प्रश्न सातत्याने डोकेवर काढताना नोकरीच्या आमिषापायी एका तरुणीवर असा प्रसंग यावा याबाबत नागरीकांमधुनही अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांबाबतीत संताप व्यक्त केला जात आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment