संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

माजी प्राचार्य बी.डी.कुलकर्णी यांचे निधन !

SHARE:

शिरुर : ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि भारत इतिहास संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष शिरुरचे माजी प्राचार्य डॉ.भगवंत देविदास ऊर्फ बी.डी.कुलकर्णी यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 76 वर्षांचे होत.बी.डी.कुलकर्णी यांनी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात तब्बल 30 वर्षे इतिहास विषय विद्यार्थ्यांसमोर अत्यंत सोप्या पध्दतीने ठेवण्याचे काम केले होते. त्यांच्या अध्यापनात प्रचंड गोडी असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात. 1994-95 मध्ये बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी आपली कारकिर्द भूषविली आहे. जून 2001 मध्ये त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील कला,वाणिज्य महाविद्यालयातही प्राचार्य म्हणून आपली कारकिर्द यशस्वी केली आहे. गेली अनेक वर्षे ते पुण्यातील इतिहास संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहीले आहे. विद्याथ प्रिय प्राध्यापक म्हणून लौकीक मिळवितानाच एक माणूसकीप्रधान व्यक्तीमत्व म्हणूनही त्यांची सर्वांना ओळख होती.

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment