संवाद वाहिनीचा पुढील अंक – 6 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 4 सप्टेंबर 2026

मुलांच्या अपेक्षा उंचावल्या मात्र पालक कधी सजग होणार भोवतोय अतिलाड,होतोय अतिरेक चंगळवाद कधी थांबणार?

SHARE:

आई-बाबा दोघेही नोकरीला जातात, किंवा व्यवसायानिमित्त सतत बिझी असतात, एकत्र कुटुंब पध्दती नष्ट होत चालल्याने मग मुलं शाळा, कॉलेजांना जातात तिथे ज्या पध्दतीचे मित्र-मैत्रीणी भेटतात त्यांच्या स्वभावगुणांच्या प्रभावाने तेही तसेच घडतात. माझ्या मित्राकडे आयफोन आहे, चांगली बाईक आहे मग मला पण हवीच, म्हणून पालक कर्ज काढून मुलांचे हट्ट पुरवतात, एकेक पायरी पुढे जातात, शेवटी पालकांनाही मर्यादा येतात आणि मग सुरु होतो, पालक आणि मुलांमधील छुपा संघर्ष, जो नकळत सतत टोकाला जातो, मग निराशा, एकटेपणा, डिप्रेशन या गोष्टींमुळे मुलं मानसिक दृष्ट्या खचत जातात, एकटी पडतात, मुलं आणि पालकांमधील संवादाची दरी वाढत गेल्याने मुलंही मग आपल्या इच्छा पूर्ण न झाल्याने काही मुले नकळत चुकीचा मार्ग स्विकारतात हीच मुले गुन्हेगारीकडे वळतात. आपल्या बाजूला दिसणारं हे जळजळीत वास्तव आहे, पण याची भीषणता समजून प्रत्येक पालकाने स्वत:ला बदलणे गरजेचे आहे. हट्ट जरुर पूर्ण करावा, पण तो आवाक्यात असणारा आणि चंगळवादाकडे नेणारा नसावा, आपल्या मुलांना आपल्या संस्कारात आणि धाकात ठेवणारा असावा, त्यांचे मित्र-मैत्रीणी कोण, ते कुठे जातात, अधिक वेळ कुठे असतात, अभ्यासात त्यांची प्रगती कशी आहे याचा आढावा घ्यायलाच हवा. वास्तविक मुलांसोबतचा संवाद वाढला की दरी नक्कीच कमी होते, ती बोलकी होतात, विश्वासात घेतलं की सगळं सांगतात, पण आपणचं मुलांना गृहीत धरतो, ते चांगलंच वागणार अशी अपेक्षा ठेवतो, यातूनच मग पालकांचीही निराशा झाली की पालकही खचून जातात. म्हणूनचं आता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सजग असलचं पाहीजे यातच संपूर्ण कुटुंबाचं हित आहे, एवढे मात्र निश्चित !

कोरोना सारखी मोठी संकटे पेलल्यानंतर अलिकडच्या काळात समाज खुप हळवा झाल्याचे चित्र सर्वत्र अनुभवायला मिळत आहे, जगणं, वाचणं महत्वाचं, जीवनाचा आनंद घेतानाही सुख शोधण्याचा मोह माणसाला सध्या अस्वस्थ बसू देत नसल्याने समाज अधिक धार्मिक होत चालल्याचंही अनुभवायला मिळत आहे, उध्वस्त झालेली एकत्र कुटुंब पध्दती पालक आणि मुलं यांच्यात निर्माण झालेला दुरावा, मुलांमध्ये वाढत चाललेला चंगळवाद आणि वेळोवेळी अपेक्षापूर्ती न झाल्याने पाल्याच्या पदरी येणारी निराशा, डिप्रेशन याचाही परिणाम नव्या पिढीवर होताना दिसून येत आहे, याला जबाबदार कोण ? याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही, मात्र आता बदलणं नक्कीचं आपल्या हातात आहे, किमान यामुळे तरी आपण पुढची पिढी वाचवू शकतो

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment