प्रिये, तुझ्याबद्दल काय बोलावं, काय मांडावं, काय लिहावं खरचं मी नि:शब्द आहे, तू जितकी मनमोकळी आहेस, तितकीच समजूतदारही आहेस, तुझ्या मनात दडलेली आपुलकीची आणि आपलेपणाची भावना मनाला भारावून टाकते, तुझ्या मनात सर्वांंप्रती असणारा आदरभाव तुझ्याबद्दल नेहमीच आदर निर्माण करतो. तू मनाने खरी आहेस, दिलदार आहेस, मनात कपटभाव न ठेवता आपल्या विचारांशी प्रामाणिक आणि सडेतोड आहेस, म्हणूनचं तू मला मनापासून खुप खुप आवडतेस, तुझ्या मनात असणारा सच्चा भाव मनाला सहजपणे तुझ्या प्रेमात पाडून जातो, त्यासाठीच हा पत्रप्रपंच. तू नेहमीच माझ्याशी मनमोकळेपणाने वागतेस, बोलतेस, अगदी भावनिक होवून मला मनातलं सगळं काही विश्वासाने सांगतेस, पण आपल्यात असं काय नातं आहे मला ठावुक नाही, की तू सहजपणे माझ्याशी मोकळेपणाने बोलावं आणि मीही सहजपणे तुझ्याशी मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात. खुप छान वाटतं तुझ्याशी बोलताना, तुला मनातलं सांगताना. तुझ्या सोबत असलं की आयुष्याचा हा प्रवास अगदी सोपा होवून जातो. तुझ्या सोबत घालवलेले काही तास मनाला प्रसन्न करुन जातात. मग निर्माण होते सतत सतत तुझी ओढ आणि तुझ्या त्या गोड शब्दाचा हवा हवासा वाटणारा सहवास. का कुणास ठावुक पण हल्ली तुझ्यात हरवताना मी स्वत:ला विसरुन जातो.
आयुष्यात प्रेम-बिम सारं झुठ असतं असं म्हणणारा मी जेंव्हा तुझ्या भेटीच्या ओढीनं तुझी वाट पाहत बसतो तेंव्हा मलाही प्रेमाचं महत्व अधोरेखित झालेलं असतं. मला माहित नाही ही ओढ का आणि कधी निर्माण झाली,
पण नकळत जोडलेल्या या रेशीमगाठीने आयुष्याच्या या उंबरठ्यावर आता तुझ्या मुळेचं जगण्याचं बळ मिळालंय. उंच भरारी घेण्याची जिद्द निर्माण झालीय. तुझ्या सान्निध्यातला प्रत्येक क्षण आता मला महत्वाचा वाटू लागलाय. म्हणूनच प्लीज माझ्या मनातल्या या भावनेला काय म्हणावं मला कळत नाही, तुझ्यातही ती तळमळ ती ओढ, तो आपेलणा मीही वेळोवेळी अनुभवला आहे, म्हणूनचं तुला मनापासून मनापर्यंत एकच विनंती आहे, मी तुझ्या प्रेमात आहे मला समजून घे, तुझ्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत मला ठावुक नाही परंतु तुझ्याही मनात माझ्याविषयी ती आपुलकीची आणि हळवी भावना असावी हाच विचार समोर ठेवत मी तुला माझ्या प्रेमाचा स्विकार कर अशी विनंती करतो आहे. पण प्लीज नाराज होवू नकोस, तुझ्या मनातील निर्मळ भावना तू माझ्यासमोर मांडावीस अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे, तुझे मन मी जाणले आहे, माझ्या मनातील भावनांचा तू अतिशय आपलेपणाने स्विकार करशील अशी अपेक्षा आहे ! तुझं स्थान माझ्या आयुष्यात प्रचंड मोठं आहे, तुझ्याशिवाय मी शुन्य आहे, म्हणूनच मला तुझा होकार हवा आहे, प्लीज देखील ना होकार ?
मदन काळे :
9665992992








