सखे, तुझ्याबद्दल काय लिहावं, कुठून सुरुवात करावी खरचं कळत नाही,रात्रं-दिवस तुझ्याचं विचारांमध्ये हरवलेला मी, तुझ्या आठवणींमध्ये नेहमीच हरवून जातो. असं वाटतं मनातून तुझा विचार कधी जावूच नये. तुझ्या नुसत्या आठवांनीही मन अगदी प्रसन्न होवून जातं. तुझ्याबद्दल खुप खुप काही वाटतं पण खरं सांगू तू समोर आल्यानंतर तुला सांगण्याचं धाडसचं होत नाही, अचानकपणे तू समोर येतेस तेंव्हा माझे शब्द अबोल होतात, मनातल्या भावना दाटून येतात पण सारं काही समोर ठेवण्याचं धाडसचं होत नाही, म्हणूनचं तू समोर असल्यानंतर खरं सागू मी पूर्णपणे नि:शब्द होतो.
पण एक सांगू, मनाने तू इतकी सुंदर आहेस की, तुझ्यातील निर्मळता पाहून मला तुझा नेहमीच हेवा वाटतो. तू नेहमी खरं बोलतेस, तुला खोटेपणाचा प्रचंड राग आहे, मला माहितीय शारिरीक सौंर्द्याला तुझ्या नजरेत शुन्य किंमत आहे, म्हणूनचं तू कधीही छान दिसण्याला भाव देताना दिसत नाहीस, पण तू स्वत: मात्र इतकी सुंदर असूनही कधी तुझ्या सुंदरतेवर गर्व केला नाहीस वा कधी त्याचा तोराही मिरवला नाहीस, तुझ्यातील माणूसकी मला प्रचंड भावते, तुझ्यातील आपलेपणा माझ्या हृद्यात नेहमीचं घर करुन राहतो, तुझ्यातील भावुकता मनाला नेहमीच आपलीशी वाटते, म्हणूनचं खरं सांगतो प्रिये तू मला नेहमीचं आवडतेस, खरं सांगू मी तुझ्या सौर्द्यावर कधीचं प्रेम केलं नाही, मी मनापासून तुझ्यातील चांगुलपणावर, माणूसकीवर प्रेम केलंय, म्हणूनचं तू मला अधिक भावतेस आणि आवडतेस, खुप दिवसांपासून तुझ्यासमोर मनातलं सारं काही मांडण्याची मनापासून इच्छा होती, पण अनेकदा प्रयत्न केला, पण खरं सांगू धाडसचं झालं नाही, म्हणूनचं आज या पत्राद्वारे तुला मनातलं सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, तू मला मनापासून खुप-खुप आवडतेस, माझं तुझ्यावर मनापासून प्रचंड प्रचंड प्रेम आहे, म्हणूनचं मला तुझा मनापासून होकार हवा आहे, सांग देशील ना, पण प्लीज नाराज होवू नकोस, माझ्यापासून दूर जावू नकोस, तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत ठावुक नाही, परंतु होकार असेल तर मनापासून आनंद होईल, पण नकार असेल तर प्लीज अशीचं बोलत राहा, पण दूर जावू नकोस, प्लीज फक्त एका होकाराची अपेक्षा आहे!








