संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

संवाद वाहिनी / संवाद लाईव्ह टीव्ही चे मालक / मुख्य संपादक मदन काळे यांची संपूर्ण वाटचाल

SHARE:

संवाद वाहिनीचे मुख्य संपादक मदन काळे एक लोकप्रिय लेखक व निर्भीड पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत

1992 साली मदन काळे यांनी आपल्या पत्रकारितेच्या वाटचालीला सुरुवात केली, आज त्यांच्या वाटचालीला 33 वर्ष झाली आहे, अत्यंत परखड लेखनशैली, अभ्यासपूर्ण मांडणी, अचूक विषयांचा वेध, सडेतोड लेखन, निवडणूक काळात अचूक विश्लेषणाद्वारे मांडले जाणारे अंदाज त्यातून वाचकांसमोर येणारा तसाच निकाल, आपल्या अनोख्या पॉलिटिकल स्टॅटिजीद्वारे आजपर्यंत असंख्य उमेदवार आमदार खासदार यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे ही मदन काळे यांची खासियत आहे.
सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन समाजामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने गेली 24 वर्ष संवाद वाहिनीचे मोफत वितरण केले जात आहे, त्यामुळे मदन काळे यांचा एक खास वाचकवर्ग गावागावातून अनुभवायला मिळत आहे

मदन काळे यांच्याकडे असलेली सध्याची पदे / माहिती –
सध्याचे पद – उपाध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ
संचालक – संवाद मीडिया कॉर्पोरेशन
संचालक – संवाद मूव्हीज अँड प्रॉडक्शन
मुख्य संपादक/ मालक- संवाद वाहिनी, संवाद लाईव्ह टीव्ही

मदन काळे यांनी लिहिलेली लोकप्रिय पुस्तके –
1) शिरूर दर्शन (संशोधनपर लेखन) 2) मी अनुभवलेला माणूस (व्यक्ती चरित्र) 3) गंमत गावची धमाल कथा (लहान मुलांसाठी प्रबोधनपर कथा संग्रह) 4) धमाल गाणी गमतीची (लहान मुलांसाठी गाण्यांचा संग्रह) 5) सखी (कॉलेज तरुणांसाठी खास प्रेमपत्र, तिला प्रपोज करताना धमाल आयडिया)

लेखन सुरू –
जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या जीवनावर आधारित एक वेगळे पुस्तक, जी एक कादंबरी वाटेल, प्रवास वर्णन वाटेल तर कधी कधी वाचकांना ते आत्मचरित्रही वाटेल अशी याची रचना आहे
2) निलेश लंके यांचा जीवनप्रवास यावर लेखन सुरू आहे

मदन काळे यांची यशस्वी कारकीर्द –
कॉलेज कट्टा व मासिक फुलबाग यापासून लेखन प्रवासाला सुरुवात, या दोन्हीही मासिकमधून शेकडो लेख, मुलाखती, विविध सदरे आणि कथा प्रसिद्ध
1) नगर तरुण भारत- उपसंपादक (1997- कालावधी- सहा महिने)
2) नगर लोकसत्ता – उपसंपादक (1997-1998)
3) देवकृपा पब्लिकेन मुंबई येथील प्रसिद्ध होणाऱ्या रसिक परिवार या मासिकात मुख्य संपादक म्हणून काम (1998 ते 1999)
4) डिसेंबर 1999 मध्ये साप्ताहिक संवाद वाहिनी या नावाने स्वतःच्या मालकीचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आणि ग्रामीण भारतात सर्वप्रथम मोफत वितरणाची संकल्पना राबवून या क्षेत्रात क्रांती घडवली, यामुळेच संवादला ग्रामीण भारतातील एका विशिष्ट परिसरात सर्वाधिक वितरित होणारे वृत्तपत्र म्हणून आंतराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे, जे इतर कोणत्याही वृत्तपत्राला आजपर्यंत मिळाले नाही

मदन काळे यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार –
1) अप्रतिम मीडियाच्या वतीने दिला जाणारा संपादकीय नेतृत्व व माध्यम उद्योजकता या गटातील प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान (2022)
2) पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा जेष्ठ पत्रकार सन्मानित पुरस्कार (2008)
3) मी विजेता होणारच ! हा विशेष सन्मान पुरस्कार , 2010 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबईत मध्ये मिळाला
4) शब्द गंध साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा लक्षवेधी शब्दगंध साहित्यिक पुरस्कार अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते प्रदान
5) विमल प्रकाशनाच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अरुण साधू यांच्या हस्ते प्रदान (1993)
या बरोबरच असंख्य जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत

सध्या मदन काळे मोठ्या धाडसाने ग्रामीण भारतातील पहिले मीडिया अँड प्रॉडक्शन हाऊसची उभारणी करीत आहेत यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, डिजिटल मीडिया, सॉफ्टवेअर आणि प्रॉडक्शन हाऊस अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणार आहेत, सध्या शिरूर येथील सुशीला पार्क येथे मिडिया अँड प्रोडक्शन हाऊसची भव्य इमारत उभी राहिली असून पुढील काम सुरू आहे, हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर माध्यम क्षेत्रात 140 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणारे SMC हे जगातील पहिले मिडिया अँड प्रॉडक्शन हाऊस ठरणार आहे

संवाद वाहिनी विषयी महत्वाचे-
1) ग्रामीण भारतातील एका विशिष्ट परिसरात सर्वाधिक वितरण होणारे वृत्तपत्र म्हणून संवादला गेल्या दहा वर्षांपासून मिळाले आहे आंतराष्ट्रीय मानांकन, जे आजपर्यंत इतर कुणालाही मिळालेले नाही
2) घरा-घरात वृत्तपत्र मोफत वितरित करण्याची संकल्पना 24 वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा संवाद वाहिनीने राबवून, या क्षेत्रात इतिहास घडविणारे नाव म्हणून संवादने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे
3) परखड लेखनशैली, सडेतोड बातम्या, स्थानिक विषयांना प्राधान्य, सर्व घटकांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक विषयांना प्राधान्य देऊन विश्वासार्ह व माहितीपूर्ण विषयांची मांडणी करणारे लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून संवादची ओळख
४) सर्वोत्कृष्ट पेपर, आकर्षक मांडणी, प्रभावी कंटेन, भारतात प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये नंबर वन असणाऱ्या मुंबई येथील टाईम्स ऑफ इंडिया येथे संवादचे प्रिंटिंग केले जाते, यामुळेच संवाद वाहिनीची सर्वोत्तम छपाई आणि सर्वोत्कृष्ट मांडणी या बळावरच संवाद आहे वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय साप्ताहिक वृत्तपत्र
५) संवाद कडे आहेत प्रोफेशनल डिझाइनर, एक्स्पर्ट कंटेन रायटर
६) 15 मुलांची सक्षम टीम, तीन सुपरवायझर, आणि संवाद वाहिनीच्या मालक सौ.दीपाली काळे व संचालक नचिकेत काळे स्वतः वितरण यंत्रणे सोबत असतात त्यामुळे एकही पेपर वाया जात नाही ही आहे संवादची खासियत म्हणूनच आपणा सारखे लाखो वाचकांच्या बळावरच संवाद नेहमीच नंबर वन ठरला आहे

संवाद लाईव्ह टीव्ही –
मदन काळे यांनी ज्या काळात सोशल मीडियाचे फार प्रस्थ नव्हते त्या काळात SANVAD LIVE TV या You-Tube चॅनेल्स ची उभारणी केली, आणि अनेक उपक्रमांना महत्वाच्या व्यक्तींना जगभरात पोहोचवले, अनेक महत्वाच्या विषयांना हात घालून त्या विषयांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले, या चॅनेल्सला Silver Button प्राप्त झाले आहे, तसेच स्वतंत्र विषय समोर ठेवणारा You-Tube चॅनेल म्हणून लोकप्रिय आहे, ग्रामीण भारतातील न्युज मध्ये कार्यरत असणारा एकमेव Verified चॅनेल म्हणूनही या चॅनेल्स चे सध्या 2 लाख + Subscriber आहेत तर अनेक विषयांना 10 ते 20 लाख views आहेत, सध्या स्टुडिओचे काम सुरू असल्याने चॅनेल्स ची रुपरेषा बदलण्यासाठी प्रसारण थांबवले आहेत, अनेक नाविन्यपुर्ण विषयांसह हा चॅनेल्स नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
संवाद लाईव्ह टीव्ही (ग्रामीण भारतातील YOU-TUBE न्युज चॅनेल्स मधील पहिले VERIFIED चॅनेल म्हणून या चॅनलने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

कॉर्पोरेट ऑफिस –मदन काळे : 9665992992 / 9665970970
संवाद भवन, 1023B/50, तहसील कार्यालयासमोर, डॉक्टर भालेकर यांच्या व्हिजन केअर सेंटर हॉस्पिटल शेजारी, सुशीला पार्क, सुरजनगर, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा-पुणे, पिन -412210

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment