संवाद वाहिनीचा पुढील अंक दिवाळी विशेषांक – 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 10 ऑक्टोबर 2025

12 वर्षांचे 12 पर्व संपल्यावर 144 वर्षांनी महाकुंभाचा योग येतो 12 राशींच्या भ्रमणानुसार कुंभमेळा साजरा करताना ज्योतीष,खगोलशास्त्राचा दाखला दिला जातो

SHARE:

महाकुंभमेळ्याचे महत्व खगोलीय आणि ज्योतीष शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत अनन्यसाधारण असे आहे, म्हणूनचं ऋषी मुनींच्या आणि साधू-साध्वींच्या सान्निध्यात साजरा होणारा हा महाकुंभमेळा यंदा उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे होत आहे. 144 वर्षांनी या महाकुंभाचा योग येत असल्याने इथे सुमारे ६२ कोटीपेक्षा अधिक भाविकांनी भेट दिली आहे                                                            वास्तविक पाहता कुंभमेळ्याच्या व महाकुंभ मेळा आयोजनामागेही ज्योतीष शास्त्राचा तसेच खगोलीय शास्त्राचा आधार देत काही पौराणिक कथांचा संदर्भही जोडला जातो. दर बारा वर्षांनी हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज याठिकाणी कुंभमेळ्याचे चक्राकार पध्दतीने आयोजन करण्यात येते. असे सांगितले जाते की,
जेंव्हा बुध वृषभ राशीत असतो आणि सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेंव्हा कुंभ मेळ्याचं आयोजन प्रयागराज इथे करण्यात येतं,
जेंव्हा सुर्यदेव आणि बृहस्पती दोन्हीही सिंह राशीत येतात तेंव्हा हा कुंभमेळा नाशिकमध्ये साजरा केला जातो.
जेंव्हा बृहस्पती देव सिंह राशीत आणि सुर्यदेव मेष राशीत असतात तेंव्हा कुंभमेळा उज्जैन मध्ये आयोजित करण्यात येतो.
जेंव्हा सुर्य देव मेष राशीत आणि बृहस्पती कुंभ राशीत असतो तेंव्हा कुंभमेळाव्याचे आयोजन हरिद्वार इथे करण्यात येतं असं शास्त्र सांगतं. दर बारा वर्षांनी चक्राकार पध्दतीने या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते, जेंव्हा बारा राशींचे बारा वर्षांचे एक चक्र पूर्ण होते तेंव्हा कुंभमेळा साजरा होतो तर जेंव्हा 12 वर्षांचे 12 पर्व पूर्ण होतात तेंव्हा 144 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते, अर्थातच माणसाच्या हयातीत माणूस फक्त एकदाचं महाकुंभमेळा डोळ्याने पाहू शकतो, ते भाग्य या वष सर्वांना लाभले आहे. यात सुर्य,चंद्र,शनी आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ शुभ संयोग होत असतो याचवेळी खगोलीय स्थिती समुद्र मंथनाच्या काळाशी जोडलेलेली असते म्हणून हा कालावधी अधिक पवित्र मानला जातो असेही शास्त्र सांगते. या काळात महाकुंभात शाही स्नान केल्याने आत्मशुध्दी होते, पापांचा नाश होऊ न मोक्ष प्राप्ती होते, म्हणूनचं या महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी साधू संत, भाविक यांची प्रचंड मोठी गद या काळात अनुभवायला मिळते, किंबहुना यंदाच्या महाकुंभाला सुमारे 50 कोटी भक्त भेट देतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वास्तविक महाकुंभाची सुरुवात कधी झाली याबाबतचा ठोस पुरावा नाही, परंतु 850 वर्षांपूर्वी आदि शंकराचार्य यांनी याची 14 ते 16 व्या शतकात सुरुवात केली असेही बोलले जाते. चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने त्याच्या एका लेखनात सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात असे आयोजन झाल्याचा उल्लेख केला आहे तर मुघलकाळात 1665 मध्ये लिहीलेल्या खुलासातु-त तारीख गॅझेटमध्येही याचा उल्लेख आढळतो
कुंभमेळ्याच्या प्रारंभा विषयी एक अख्यायिका सांगितली जाते ती अशी की, देव आणि दैत्यांनी अमृत मिळविण्यासाठी समुद्र मंथन केले होते, त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचविण्यासाठी देव तो घेऊ न पळू लागले तेंव्हा अमृताचे काही थेंब जमीनीवर पडले ते ठिकाण होते हरिद्वार, प्रयागराज,नाशिक आणि उज्जैन, एकुणच हे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मा कुंडात, उज्जैनमध्ये शिप्र नदीच्या काठावर, नाशिकमध्ये गोदावरी किनारी आणि प्रयागराज इथे संगमावर म्हणूनच या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते अशी अख्यायिका आहे.

कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत, महाकुंभ 144 वर्षांनी एकदाच आयोजित केले जाते. अर्धकुंभ दर सहा वर्षांनी दोन पूर्ण कुंभ मेळ्या दरम्यान आयोजित करण्यात येते, हे मेळे हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात येतात. पूर्ण कुंभ दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केले जाते, हा मेळा हरिद्वार,प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी होतो.माघ मेळा दरवष माघमेळा आयोजित केला जातो, यालाच छोटा कुंभ असेही संबोधले जाते, प्रयागराजमध्ये जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा आयोजित केला जातो, अशी या कुंभमेळ्याची महती सांगितली जाते. या महाकुंभासाठी उत्तरप्रदेश सरकारने एकुण 7 हजार 500 कोटी खर्च केले आहेत तर इथे 2 लाख कोटींची उलाढाल होणार असल्याचे बोलले जात आहे, म्हणूनचं या महाकुंभाला विशेष महत्व आहे.

कसा येतो महाकुंभाचा योग ?

दर 12 वर्षांनी कुंभ मेळ्याचं आयोजन हरिद्वार,उज्जैन,नाशिक आणि प्रयागराज या ठिकाणी चक्राकार पध्दतीने केले जाते. याला ज्योतीष शास्त्रीय व खगोल शास्त्रीय आधार असल्याचे बोलले जाते. त्या त्या ग्रहांच्या स्थितीनुसार त्या त्या भागात कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते तर 12 राशींच्या आधारावर 12 वर्षातून एकदा कुंभमेळ्याचे त्या त्या राशीतल्या फलानुसार उज्जैन,नाशिक, हरिद्वार अथवा प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते, तर 12 वर्षांचे 12 पर्व पूर्ण झाल्यानंतर 144 वर्षांनी महाकुंभाचा योग येतो, जो आत्ता आला आहे. या महाकुंभात एकुण 13 आखाड्यांचा सहभाग असतो, जे आखाडे जगभर प्रसिध्द आहेत.

Source link

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Sanvad Vahini

Leave a Comment