शिरुर : शिरुर येथील हलवाई चौकातील श्रीमंत हलवाई चौक मित्र मंडळाला राज्य शासनाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंडळाने यंदाच्या वष 50 व्या वर्षात यशस्वी पर्दापण केले आहे. सध्या अशोक बाळासाहेब काळे मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गणेशोत्सव महाराष्ट्राचा या अंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित केली होती, यात जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्टला जाहीर झाला आहे.

Author: Sanvad Vahini
Post Views: 14