संवाद वाहिनीचा पुढील अंक दिवाळी विशेषांक – 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 10 ऑक्टोबर 2025

प्रभाग निहाय आरक्षण सोडतीनंतर आता इच्छुकांची संख्या आणखी वाढणार अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, म्हणे जो तिकीट देणार त्या पॅनलमधुन लढणार

SHARE:

शिरुर नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षणे जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची मोठी संख्या सध्या समोर येते आहे. बहुतांश इच्छुकांना मतदारसंघ सोयीचा झाल्याने इच्छुकांची होत असलेली मोठी गद आता शिरुर करांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकुणचं प्रभाग निहाय आरक्षण सोडतीनंतर आता इच्छुकांची संख्या आणखी वाढणार, अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, म्हणे जो तिकीट देणार त्या पॅनलमधुन लढणार असाच काहीसा सूर आता प्रत्येक प्रभागातून समोर येतो आहे एवढे मात्र निश्चित !
नुकत्याचं झालेल्या आरक्षण सोडतीत प्रभाग निहाय जाहीर झालेली आरक्षणे पुढीलप्रमाणे..
प्रभाग क्र.1 – 1अ -सर्वसाधारण (महिला), 1ब- सर्वसाधारण प्रभाग क्र.2 – 2 अ नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), 2 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र.3, 3अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, 3 ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.4, 4 अ – अनुसूचित जाती (महिला), 4 ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र.5, 5 अ- सर्वसाधारण महिला, 5ब – सर्वसाधारण , प्रभाग क्र.6, 6अ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), 6ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र.7, 7अ -नागरीकांचा मागास प्रवर्ग, 7ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.8, 8अ,- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), 8ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र.9, 9अ- अनूसूचित जाती, 9ब- सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.10, 10अ- अनूसूचित जाती (महिला), 10ब -सर्वसाधारण,प्रभाग क्र.11, 11अ- अनूसूचित जमाती (महिला), 11ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र.12, 12 अ – नागरीकांचा मागास प्रवर्ग, 12 ब -सर्वधारण (महिला)

यामध्ये प्रत्येक मतदारसंघाची एरीया नुसार अशी आहे प्रभाग रचना –
प्रभाग क्र.1 – कामाठीपुरा, कैकाडी आळी, साळुंखे मळा, रम्यनगरी, प्रोफेसर कॉलनी, ढोरआळी, कुंभारआळी, मुंबई बाजार, साईनगर
प्रभाग क्र.2- कुंभारआळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपुरा, हल्दी मोहल्ला, बुरुडआळी, मुंबई बाजार
प्रभाग क्र.3- सोनारआळी, मारुती मंदिर परिसर अष्टविनायक सोसायटी, खांडरे आळी, भाजी बाजार, जुना अंडेबाजार, फकीर मोहल्ला, लाटे आळी, सुभाष चौक,हलवाई चौक,
प्रभाग क्र.4 – सरदार पेठ, मारुती आळी, चर्च, आंबेडकर नगर, कब्रस्तान, सुशीला पार्क, खारामळा, अमरधाम, पंचासयत समिती, पीडब्लूडी, पांजरपोळ, भुजबळ मळा, ढोमेमळा,पाचर्णे मळा, घोडोबा मंदिर, पाचर्णे वस्ती, सुरजनगर, शिवाजीनगर,मार्व्हल सोसायटी
प्रभाग क्र.5- महादेव नगर, जोशीवाडी, विठ्ठलनगर, एम.एस.ई.बी कॉलनी, पोलिस लाईन, तहसिल कार्यालय, अष्टविनायक इमारत, स्टेट बॅंक कॉलनी, बायपास झोपडपट्टी
प्रभाग क्र.6 – गणेशनगर, गुजर मळा, बागवाननगर, पीडब्लूडी वसाहत, जाधवमळा, बीजे कॉर्नर, गणेशनगर,स्टेट बॅंक कॉलनी
प्रभाग क्र.7 – यशवंत कॉलनी, रयत शाळा, सैनिक सोसायटी, जिजामाता सोसायटी, शिवाजी सोसायटी, गीतानगर, कुकडी वसाहत, रेव्हेन्यु कॉलनी, कोर्ट परिसर, वसंतराव नाईक नगर, करंजुले वस्ती,
प्रभाग क्र.8- डंबेनाला, आडत बाजार, कापड बाजार, रामआळी, मारुती आळी, सरदार पेठ, पुणे-नगर रोड, रेव्हेन्यु कॉलनी, शांतीनगर, एस.टी.डेपो परिसर
प्रभाग क्र.9 – साईनगर, काचीआळी, सिध्दार्थनगर, सय्यदबाबा नगर, संजयनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रभाग क्र.10- एमएसईबी सव्हस सेंटर, नवीन मार्केट यार्ड, पाबळ फाटा, एम.एस.ईबी सर्व्हिस सेंटर, वाडा वसाहत, गोपाळवस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरानगर, बीसी.हौसिंग सोसायटी,नवीन नगरपरिषद प्रशासकीय इमारत, अग्नीशमनकेंद्र, इसवेनगर
प्रभाग क्र.11 – कामाठी पुरा, एस.टी. कॉलनी, श्री हाईटस्‌‍, आनंद सोसायटी, ख्रिश्चन दफनभूमी परिसर, सटफाईड स्कूल परिसर, पवार मळा, मंगलमुत नगर, गादीया मळा, पाषाणमळा, बायपासरोड, दत्त मंदिर परिसर, भिल्ल वस्ती, पारधी वस्ती, जलशुध्दीकरण केंद्राजवळील झोपडपट्टी, प्रितमप्रकाश नगर,माजीचा मळा,
प्रभाग क्र.12 – हुडको कॉलनी, दिघे मळा, सीटी बोरा कॉलेज, फार्मसी कॉलेज, बाफना मळा, बोरा मळा, शिक्षक कॉलनी, साई गार्डन परिसर, डायमंंड प्लाझा सोसायटी, गोलेगांव रोड, घोडोबा मंदिर परिसर

अशा विस्तारीत मतदारसंघात इच्छुकांनी आता जोरदार तयारी सुरु केली आहे, आता लढणारचं, जो तिकीट देणार त्या पॅनेलकडून लढणार अशी भूमिका अनेकजण व्यक्त करीत आहेत.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Sanvad Vahini

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई