संवाद वाहिनीचा पुढील अंक दिवाळी विशेषांक – 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 10 ऑक्टोबर 2025

योग्य गुंतवणुकीसाठी आता फ्लॅट अन्‌‍ प्लॉट खरेदीला ग्राहकांची पसंती मिळतेय मध्यवत केंद्र म्हणून शिरुर तालुक्याला अधिक महत्व येतेय

SHARE:

कोरेगाव, शिक्रापूर, कारेगाव, रांजणगाव, सुपा या भागात झपाट्याने वाढणारे औद्योगिकरण, आगामी काळात होऊ घातलेला अतिजलद पुणे-औरंगाबाद महामार्ग, शिरुरला जोडणारा समृध्दी महामार्ग, विदर्भ, मराठवाडा, गुजरात, राजस्थान व पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आणि विविध राज्यांना जोडणारे एक केंद्रस्थान म्हणून ज्या भागाची ओळख आहे, अशा शिरुर तालुक्याला आता गुंतवणुकीसाठी प्रथम प्राधान्य मिळताना दिसत आहे, याचं अनुषंगाने शिरुर शहर, उपनगरे, कारेगाव, रांजणगाव, शिक्रापूर, तळेगाव या भागात मोठ्या प्रमाणात सध्या प्लॉटींग व्यवसायाला चालना मिळत आहे. तर याचं भागातून फ्लॅट खरेदीला देखील ग्राहक पसंती देताना दिसत आहेत. एकुणचं योग्य गुंतवणुकीसाठी मोठ्या शहरानंतर ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वेात्तम पर्याय म्हणून आता शिरुरची वेगळी ओळख निर्माण होताना दिसून येत आहे. एकुणच योग्य गुंतवणुकीसाठी आता फ्लॅट अन्‌‍ प्लॉट खरेदीला ग्राहकांची पसंती मिळतेय, मध्यवत केंद्र म्हणून शिरुर तालुक्याला अधिक महत्व येतंय ही वस्तुस्थिती आहे.
कोरोनानंतर आता अधिक सुरक्षित जगणं आणि निसर्गरम्य वातावरणाकडे शहरी नागरीकांचाही ओढा निर्माण होताना दिसत आहे. त्यात सर्व दिशांना आणि सर्व विभागांकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा, सहज उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या, कोणत्याही व्यवसायाला इथे मिळणारी चालना, परराज्यांतील नागरीकांनाही सुरक्षित वाटणारे शहर, सहजपणे उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक सुविधा आणि शहर असूनही सर्वांना मिळणारा ग्रामीण टच, इथली माणूसकीप्रधान माणसं आणि प्रत्येकामध्ये इथे निर्माण होणारी सुरक्षेची भावना, यामुळे साहजिकच पूव शहरामध्ये स्थायिक असलेली पंरतु आता निवृत्तीनंतर गावाकडे राहण्याचा ध्यास घेतलेली मंडळी आता शिरुरकडे गुंतवणुक करुन इथेच राहण्याचा विचार करताना दिसत आहेत.
नोकरदार, व्यावसायीक तसेच विविध कारणांनी शिरुरमध्ये आलेली व्यक्ती इथल्या पूरक वातावरणामुळे इथेच स्थायिक होणे पसंत करीत असल्याने सर्व भाषिक लोक शिरुर तालुक्याच्या विविध कानाकोपऱ्यात सहजपणे आढळून येतात. इथली वाढती लोकसंख्या आणि वाढता रोजगार यामुळे साहजिकच इथे सध्या गुंतवणुकीसाठी आता लोक पुढे येताना दिसत आहेत. त्यामुळे जागांनाही चांगले भाव आले आहेत तर चांगल्या ठिकाणी फ्लॅट किंवा प्लॉट हवा असेल तर त्यासाठी आता जागांचे भावही वधारले आहेत. यानिमित्ताने मंदीतही आता या व्यवसायाने आता मात्र चांगलीच गती घेतल्याचे चित्र समोर येत आहे, लवकरच या महामार्गाला आणखी गती मिळणार असल्याने गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणूनही आता शिरुर तालुका व परिसराकडे पाहीले जात आहे, म्हणूनचं असंख्य मोठे बिल्डर्सही आता शिरुरमध्ये आपल्या स्कीम लॉंच करुन ग्राहकांना आकर्षित करताना दिसून येत आहेत एवढे मात्र निश्चित !

शिरुरला का मिळतेय गुंतवणुक दारांची पसंती ?
खालील कारणे महत्वाची ठरतात

-पुणे-अहिल्यानगर या संपूर्ण हायवेवर विस्तारलेला सर्वात मोठा तालुका म्हणजे अर्थातच शिरुर तालुका आहे, दळण-वळणांसाठी असलेली पूरेशी साधने, रात्री-अपरात्री सहज उपलब्ध होणारी वाहतुक व्यवस्था
-पुणे-मुंबई पासून अगदी जवळच्या अंतरावर असणारे महत्वाचे मोठे केंद्र , अत्यंत चांगली असणारी भौगोलिक रचना
-याचं मार्गावरुन शिड, शनिशिंगणापूर, रांजणगांव गणपती, मोहोटादेवी, मढी, पाथड या महत्वाच्या देवस्थानांना जोडणारा हा महामार्ग असल्याने या रस्त्यांवरुन नेहमीच होणारी मोठी वर्दळ
-सहजपणे कोणत्याही भागात जाण्यासाठी सहज असणारा ॲक्सेस, अत्यंत सुरक्षित वातावरण, स्वच्छ हवामान, त्याचबरोबर भौगोलिकदृष्ट्या सर्वांना मानवणारे वातावरण
-पुणे-अहिल्यानगर हायवेवर प्रचंड मोठे विस्तारलेले औद्योगिक क्षेत्र, इथे उपलब्ध असणारी नोकरी-व्यवसायाची मोठी संधी, शहर असूनही शहरासारखी नसणारी प्रचंड महागाई, प्लॉटींगसाठी उपलब्ध असणारे मोठे क्षेत्र
-झपाट्याने विस्तारत असलेले औद्योगिक क्षेत्र, वेगाने वाढत असलेले जागांचे दर, जागा खरेदी-विक्रीसाठी असणारे पोषक वातावरण, जागांना असलेली प्र्रचंड मोठी मागणी

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Sanvad Vahini

Leave a Comment