आयुष्यात असंख्य माणसे अनुभवली, पारखली आणि वाचली देखील,परंतु माणसांच्या या गदत माझेही अंदाज नेहमीचं चुकत गेले, ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांच्यावर आपण कधीचं भरवसा दाखवत नाही, परंतु जी माणसं आपल्याला शब्दांमध्ये अडकवतात तीच माणसे अखेर घात करतात, असा अनुभव मी नेहमीच घेतला आहे, यातूनचं आयुष्याच्या या विद्यापीठात अनुभवाची शिदोरी घेत गेलो, चांगली माणसे जोडत गेलो आणि वाईट माणसे आयुष्यातून वजा करताना त्यांच्या बाबतीत मी मनात द्वेश बाळगत कधीचं बसलो नाही किंवा त्यांच्याबाबत निंदा करण्याचीही कधी माझी इच्छा झाली नाही. त्यांचे कर्म त्यांच्या पाशी म्हणत मी माझी वाटचाल करीत राहीलो, म्हणूनचं मला सोडून गेलेल्याचं मला कधीचं दु:ख वाटलं नाही, किंबहुना अशा माणसांची साधी आठवणही मनाला कधीचं चटका लावून गेली नाही, जी माणसं जवळ होती तोपर्यंत ती माझी होती,पण दूर जाताना ती माझी नव्हतीचं, अशी खुनगाठ मनाशी बांधून मी मानसिक तयारी केल्याने मला त्याचा कधीचं त्रास झाला नाही, उलट हीच माणसे माझ्या विरोधात सातत्याने कुरघाड्या करीत राहीली, मी माझ्या यशाच्या एकेक पायऱ्या चढत असताना त्यांची मात्र घसरण सुरुचं होती, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मौल्यवान वेळ चुकीच्या कामासाठी घालवल्यानेचं कदाचित त्यांची प्रगती झाली नसावी, म्हणूनचं मीही अशांचा फारसा विचार करीत नाही, जी आपल्या वाटेत हितचिंतक म्हणून येतात त्यांचं आपल्या ह्द्यात मनापासून स्वागत आहे, परंतु अशी माणसं आपल्या जवळ येताना जर आपलं सुख पाहून स्वत: दु:खी होत असतील तर अशी माणसं आपणही ओळखायला शिकलं पाहीजे असं प्रत्येक वळणावर वाटत राहीलं, पण अशी माणसं ओळखायला मी नेहमीच कमी पडलो, माणसं समोर येत गेली, विश्वास ठेवत गेलो, पण ती चांगली वाईट ठरवताना नेहमीच माझेही अंदाज चुकत गेले, त्यामुळेचं जीवनाच्या या वाटेत अनेकदा मोठा अडसर निर्माण झाला, परंतु आता मात्र मी प्रत्येक नजरेत माणूस पारखायला शिकलो आहे, आपण समोर आलेली माणसं टाळूचं शकत नाही, म्हणूनचं त्यांना न दुखावता मनापासून दूर ठेवणंचं अधिक चांगलं, यातचं खरं शहाणपण आहे, कारण खरेपणाला त्रास होतो, पण खोटेपणा कधीचं टिकत नाही,असत्याचा पराजय अटळ आहे, पण सत्य कधीचं झाकत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे, म्हणूनचं मी आज यशस्वी आहे, याचा मला नक्कीचं सार्थ अभिमान आहे.
