संवाद वाहिनीचा पुढील अंक दिवाळी विशेषांक – 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 10 ऑक्टोबर 2025

मन साफ ठेवा, माणसं जवळ येतील अपयशाची चिंता सोडा, स्वप्न पूर्ण होतीलं

SHARE:

माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे धाव-धाव धावतो, जीवाचा आटा पिटा करुन संपत्ती मिळवतो, कशासाठी तर पैशातून सुख शोधण्यासाठी, वेळेवर जेवण नाही, पूरेशी झोप नाही, सकाळी बाहेर पडताना मुलं शाळेत गेलेली असतात, रात्री उशीरा येताना झोपलेली असतात त्यामुळे मुलांशी पूरेसा संवाद नाही, आठवडाभर मुलांचं तोंडही दिसत नाही अशी आपली अवस्था, आपण इतके बिझी कधी झालो आपल्यालाच कळले नाही, पण खरचं मागे वळून पाहताना अनेकदा विचार येतो, आपण असं जीवन जगताना खरचं सुखात आहोत का ? पैसा ही माणसाची गरज आहे, पण पैशातून नक्कीच सुख विकत घेता येत नाही, पैशातून आनंद विकत घेेता येत नाही, ज्या पोटासाठी आपण धाव धावतो त्याच पोटात दोन घास टाकण्यासाठीही आपल्याला वेळ नाही, ज्या सुखाची झोप लागण्यासाठी आपण वण-वण करतो ती झोपही आपल्या नशीबी येत नाही मग आपण जगतो आहोत कशासाठी ? असाही कधी कधी प्रश्न पडतो, पण मनात विचार येतो,मग जगण्यासाठी पैसा गरजेचा नाही का ? तर हो नक्कीचं आहे, पैशाशिवाय माणसांचं आयुष्य निरर्थक आहे, आपल्याकडे पैसा नसेल तर आपली समाजातील किंमत शुन्य आहे, पण असंही नाही की, आपण फक्त पैशासाठीच जगलं पाहीजे, योग्य नियोजन करुन, आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेवून जर आपल्या दैनंदिन जीवनाचं योग्य नियोजन केलं, योग्य ध्येय समोर ठेवून जीवनाची वाटचाल केली तर जीवनाचा आनंद घेण्याबरोबरच आपल्याला हवा तितका पैसाही मिळविता येईल आणि चांगलं जीवन जगण्याचा आनंदही प्राप्त करुन घेता येईल, म्हणूनच जीवनाकडे व्यापक दृष्टीकोणातून पहायला हवं असं मला वाटतं, आपल्याला मिळालेलं आयुष्य मौल्यवान आहे, तितकचं आपलं आरोग्यही महत्वाचं आहे. या आधुनिक युगात व्यावहारिक माणसेच मोठी होतात, ज्याचा व्यवहार चांगला त्याची समाजातील पतही टिकून राहते आणि त्याच्याकडे मदतीचा ओघही वाढत जातो. त्यामुळे समाजात वावरताना आपले व्यवहार चांगले असले पाहीजेत, मन साफ असलं पाहीजे, नेहमीच सकारात्मक विचार समोर ठेवत आपली वाटचाल केली पाहीजे, नकारात्मक विचारांना थारा न देता, बाजारपेठेतील आव्हानांची चिंता सोडून मार्ग काढत व्यवसायाचे योग्य नियोजन केले तर नक्कीच यश फारसे दूर राहत नाही. खुप चांगलं वागा, मनात वाईट विचार आणू नका, प्रत्येकाविषयी अत्यंत चांगली भावना ठेवा, कुणाविषयी कधीच वाईट बोलू नका, एखाद्याची निंदा करु नका, या गोष्टी जर आपण मनापासून केल्या तर आपले मन नेहमीच प्रसन्न राहीलं, आपण चांगले आहोत असं मनातून वाटताना आपलाही आत्मविश्वास वाढेल आणि आपल्याला त्याचा आपल्या प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल, म्हणूनच चांगले वागा, चांगले जगा

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Sanvad Vahini

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई