संवाद वाहिनीचा पुढील अंक दिवाळी विशेषांक – 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 10 ऑक्टोबर 2025

सोन्यातली गुंतवणुक फायद्याची, कधीही करता येते कॅश गरजेची !

SHARE:

सध्या जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, डॉलरचे होत असलेले अवमूल्यन, जागतिक स्तरावर सुरु असलेली युध्दाची पार्श्वभूमी अशा असंख्य कारणांनी सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, किंबहुना सोन्याच्या दराचा हा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे अनुभवायला मिळत आहे, त्यामुळे साहजिकचं 1979 नंतर तब्बल 46 वर्षांनी पहिल्यांदा सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. किंबहुना एकाचं आठवड्यात पहिल्यांदा सोने 3 % पेक्षा अधिक वाढल्याचे दिसून आले हाही एक विक्रम मानला जात आहे. जागतिक स्तरावर अर्थतज्ज्ञांनी सोन्याच्या बाबतीत सोने गुंतवणुकीसाठी आजही सोने अत्यंत सुरक्षित मानले जाते असे म्हटले आहे. त्यामुळे सोने कितीही वाढले तरी सोन्याची खरेदी मात्र कमी होत नाही, विशेष म्हणजे एका वर्षात सोन्यामध्ये तब्बल 51 % भाववाढ झाली हा सर्वात मोठा विक्रम मानला जात आहे. मार्च 2023 मध्ये सोने 60 हजार रुपये प्रतितोळा होते, सप्टेंबर 2024 मध्ये सोने 75 हजार प्रतितोळ्यावर पोहोचले तेंव्हाच सोने खरेदीदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण होते, मात्र ऑक्टोबर 2025 मध्ये सोने 1 लाख 23 हजारांच्याही पुढे गेले, त्यामुळे साहजिकच सोने आता वाढणारचं अशी मानसिकता लोकांची झाली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यातचं तब्बल 13 वेळा सोन्याचे भाव वाढले. सध्या प्रॉपटमधील गुंतवणुक, शेअर्स मार्केट मधील गुंतवणुक जोखमीची मानली जाते, बॅकेतल्या गुंतवणुकीत कमी परतावा मिळतो मात्र सोन्यात गरज असेल तेंव्हा चटकन पैसे होतात, वेळ पडल्यास सोनं बॅंकेत ठेऊ न अगदी अल्पव्याजदरात पैसे हाती मिळतात तसे जागा वा इतर गुंतवणुकीच्या बाबतीत घडत नाही, म्हणूनचं सोनं कितीही वाढलं तरी आजही लोकांचा सोन्याच्या गुतवणुकीवर प्रचंड विश्वास आहे.सोनं खुप जलद गतीनं वाढतं पण तितक्या गतीने त्याचे भाव कमी होत नाहीत म्हणूनही सोन्याच्या गुंतवणुकीबाबत लोकांचा आजही विश्वास आहे. आता मात्र सोन्याचे भाव नक्कीचं फार कमी होणार नाहीत असे मत अनेक जागतिक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. म्हणुनच आजही सोन्यातील गुंतवणुकीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येतो

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Sanvad Vahini

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई