नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीत शिरुर शहराचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने धारीवाल समर्थकांची मोठी निराशा झाल्याचे अनुभवायला मिळाले तर नव्याने समोर आलेल्या 12 प्रभागांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत समोर आल्याने आता शिरुर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी छुप्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे, मात्र असे असतानाही अद्याप माणिकचंद उद्योग समुहाचे प्रमुख जगप्र्रसिध्द उद्योजक प्रकाशशेठ धारीवाल यांनी या निवडणुकीसंदर्भात आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र शिरुर शहर विकास आघाडीच्या कोअर टीमच्या बैठकांचे सत्र मात्र वेगाने सुरु आहे असे खात्रीलायक वृत्त आहे तसेच आमदार ज्ञानेश्वर ऊ र्फ माऊ ली आबा कटके यांनीही या निवडणुकीत ते नक्की काय भूमिका घेणार याबाबत कोणतीही स्पष्टता समोर ठेवलेली नाही त्यामुळे साहजिकच आगामी शिरुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नक्की काय घडणार याबाबत स्थानिक नेते, कार्यक्रर्ते यांच्यात संभ्रावस्था दिसून येते आहे तर या निवडणुकीत नक्की कोण कुणासोबत जाणार, कोण कुणाशी युती करणार, कोण कुणाच्या विरोधात लढणार तर या निवडणुकीत नक्की कोण प्रभावी ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वास्तविक पाहता शिरुर नगरपरिषदेवर तब्बल 20 वर्षांपासून प्रकाशशेठ धारीवाल यांची एकहाती सत्ता आहे. धारीवालांच्या विचारांचा सर्वच नेत्यांवर प्रचंड प्रभाव आहे, परंतु आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येक पक्षाला आपले अस्तित्व निर्माण करुन वर्चस्व सिध्द करायचे आहे, त्यामुळे या निवडणुकीत नेमकी विविध पक्षांची काय भूमिका असणार याकडेही आता सर्वसामान्यांचे तसेच स्थानिक राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. शिरुर शहराची 2011 च्या आकडेवाडीनुसार एकुण लोकसंख्या 37111 आहे तर 2025 च्या अंदाजीत आकडेवारीनुसार ती 52 हजारांपर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज आहे. नव्या रचनेनुसार शिरुर शहरात सध्या एकुण 12 प्रभाग असणार आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात 2 असे एकुण 24 नगरसेवक या नगरपरिषदेत त्या त्या प्रभागाचे नेतृत्त करणार आहेत. पूव नगरसेवकांची संख्या 21 होती ती आता 24 वर गेली आहे. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
कोणत्याही नेत्याने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, ही वस्तुस्थिती असली तरी नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोठी गद सध्या समोर येते आहे तर नगरसेवक पदासाठी असंख्य पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. कोणत्याही पॅनल मधुन संधी मिळो आपण लढणारचं अशा भूमिकेत सध्या इच्छुक असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे यात शंकाच नाही.
शिरुर नगरपरिषदेचे माजी सभागृहनेते आणि शिरुर शहर विकास आघाडीचे नेते प्रसिध्द उद्योजक प्रकाशशेठ धारीवाल यांनी नगरपरिषदेची आगामी निवडणुक काही दिवसांवर येऊ न ठेपलेली असताना अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. विद्यमान आमदार ज्ञानेश्वर ऊ र्फ माऊ ली आबा कटके यांनीही महायुतीच्या वतीने शिरुर नगरपरिषदेच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडलेली नाही, मात्र असे असले तरी अंतर्गत छुप्या बैठकांचे सत्र मात्र दोन्हीही बाजूंनी सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिरुर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नक्की काय घडणार याकडे आता स्थानिक नेते, कार्यकर्ते सर्वांचेच लक्ष एकवटले आहे







