
शिरूर : (मदन काळे)
शिरूर शहरातील सूरज नगर जवळील सुशीला पार्क मध्ये अचानकपणे सलग दोन दिवस बिबट्या आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिरूर तालुक्याचे वनअधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी तातडीने आदेश देऊन वनसंरक्षक गणेश झिरपे व त्यांचे सहकारी रोहिदास शेंडगे, सुधीर शितोळे यांनी संबंधित भागात पिंजऱ्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता या परिसरातील नागरिक बिबट्या जेरबंद होण्याच्या प्रतीक्षेत आहेत
शिरूर शहरातील पंचायत समिती इमारत परिसर, सुशीला पार्क, सुरजनगर, अमर धाम या भागात गेल्या 6 ते 7 दिवसांपासून या सतत श्वानांची संख्या कमी होत असल्याने या परिसरात बिबट्या असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती, मात्र प्रत्यक्ष त्याचे दर्शन होत नसल्याने विश्वास ठेवायला कुणीही तयार नव्हते, परंतु काल सकाळी (31 ऑक्टोबर) रोजी सुरजनगर मधील एक रहिवासी असलेल्या आजोबांना अचानकपणे 6 वाजता बिबट्या सुशीला पार्कच्या बाहेरील बाजूच्या भिंती जवळील झाडात बसलेला आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे, यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली, परंतु काल रात्री 9 वाजता अमरधाम शेजारील डोंगरावरुन बिबट्याने खाली उतरत थेट सुशीला पार्कच्या भिंतीवरून सुशीला पार्क सोसायटीत उडी घेतल्याने सोसायटीत बिबट्याची प्रचंड दहशत पसरली होती,
हीच बाब लक्षात घेऊन संवाद वाहिनीचे मुख्य संपादक मदन काळे यांनी तातडीने शिरूर तालुक्याचे वनअधिकारी नीलकंठ गव्हाणे यांना घटनेचे गांभीर्य सांगिल्यानंतर गव्हाणे यांनी तातडीने 9.30 वाजता आपले वनसंरक्षक गणेश झिरपे यांना पाठवून आढावा घेण्याचे आदेश दिले, रात्री सर्व घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर झिरपे यांनी तातडीने उद्या सकाळी पिंजरा बसविण्याचे नियोजन केले आणि आज सकाळी (1 नोव्हेंबर) रोजी प्रत्यक्षात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्याचा ट्रॅप लावण्यात आला आहे, यावेळी या पिंजऱ्यात दोन कोंबड्या भक्ष्य म्हणून ठेवण्यात आल्या आहेत, यासाठी वनविभागाचे दिनेश गोरड, राहुल परमार, सर्पमित्र निलेश पाठक, ,विक्रम झिने यांची मोठी मदत झाली, पिंजरा बसविण्यासाठी सपाटी करणं करण्याची आवश्यकता असताना या भागातील सामाजिक कार्यकर्ते अमोल चव्हाण यांनी जेसीबीची मोठी मदत केली आहे, डोंगर बाजूने पिंजरा बसविल्यानंतर आता परिसरातील नागरिकांचे लक्ष बिबट्या कधी जेरबंद होणार याकडे लागले आहे
शिरूर शहरातील भरवस्तीत बिबट्याचा वावर आढळून आल्याने या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या भागातील बिबट्याचा वावर लक्षात घेता या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे
Author: Sanvad Vahini
Post Views: 420






