माणसाकडे मनाची श्रीमंती असेल तर जनसंपर्काचे भांडवल उभे करणे फारसे अवघड नाही. असा एकही पक्ष नाही जिथे यांचे मित्र नाहीत असा एकही नेता नाही ज्याच्याशी यांचे सलोख्याचे संबंध नाहीत सर्वांशी आपुलकीचे नाते जोडणारा असाच एक हरहुन्नरी तरुण अर्थातच संतोष प्रभाकर थेऊरकर याने आता प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 5 मधुन उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे, गेल्या वर्षभरापासून शिरुर नगरपरिषदेची निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने त्यांनी मोठी तयारी केल्याचे सातत्याने समोर येत आहे, मग ते विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम असोत वा त्यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक सहली असोत यासाठी शिरुर मधुन अर्थातच स्टेट बॅंक कॉलनी परिसरातून त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहात असलेले जनमत लक्षात घेता थेऊरकर यांची वाटचाल आता जनमताच्या दृष्टीने नक्कीचं अत्यंत प्रभावीपणे सुरु आहे. असेच काहीसे चित्र या परिसरातून अनुभवायला मिळत आहे.
आपण प्रभाग क्र. 5 मधुन निवडणुक लढणार असे जाहीर केल्यानंतर थेऊरकर यांचे नाव आता चांगलेच चर्चेत आले आहे. याच अनुषंगाने थेऊरकर यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा..
संतोष प्रभाकर थेऊरकर!
मुळ गांव शिरुर तालुक्यातील गोलेगांव जवळील दाणेवाडी , 2011 पासून शिवरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून संतोष थेऊ रकर सामाजिक कार्याच्या हेतूने राजकारणात सक्रीय आहेत. आपली कोणीतरी दखल घ्यावी याची वाट न पाहता संतोष गेली 14 वर्षे अविरतपणे आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. कोरोना काळात त्यांनी स्टेट बॅक कॉलनी परिसरातील जनतेला स्वखर्चातून शुध्द पिण्याच्या पाण्याचे अविरतपणे वाटप केले होते. तसेच स्वत:च्या वाढदिवसानिमित्ताने याच परिसरातील घरा-घरात धान्याचे किट वाटप, सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरीक व इतरांनाही निवांतपणे बसता यावे यासाठी केलेली बेंचची व्यवस्था याची आजही इथले नागरीक कौतुकाने दखल घेतात. याच परिसरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटस्ची अडचण लक्षात घेऊ न नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने थेऊरकर यांनी स्वखर्चाने त्या सुरु करुन घेतल्या आहेत याचे देखील सर्व स्तरातून कौतुक झाले. एकुणच बी.बी.ए पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण करुन एम.बी.ए.(एच.आर.) पर्यंतची शैक्षणिक भरारी घेणाऱ्या थेऊरकर यांनी एच.डी.एफ.सी बॅंकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून आपली प्रभावी कारकिर्द भूषविली देखील, परंतु बिल्डर्स आणि प्लॉटींग व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्याच्या हेतूने त्यांनी नोकरीचा राजीनामा देवून आपल्या बिल्डर्स व्यवसायात स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला. या क्षेत्रात आपली विश्वासार्हता निर्माण करुन ग्राहकांच्या मनातही आपुलकीचे व आपलेपणाचे स्थान निर्माण करण्यात यश मिळविले आहे, म्हणूनच थेऊरकर यांच्या विषयी जनतेच्या मनात नितांत आदराची भावना आहे.
आपल्या माणूसकी प्रधान स्वभावामुळे त्यांनी असंख्य मित्र जोडले आहेत. त्यांनी जास्तीत जास्त भाविकांना देवदर्शन घडावे यासाठी अत्यंत लक्झरी सुविधा उपलब्ध करुन देत परिसरातील नागरीकांना तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूरची यात्रा घडवली, दोन टप्प्यात ही यात्रा पूर्ण करताना त्यांनी आजपर्यंत 450 भाविकांना देवदर्शन घडवले आहे. अजूनही त्यांचा हा उपक्रम सुरुच आहे.
अशा या हरहुन्नरी युवकाला एका सामाजिक कार्यकर्त्यांला, यशस्वी उद्योजकाला प्रभाग क्र.5 मधील मतदार भक्कमपणे साथ देतील का ? त्यांना कुणाकडून संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष थेऊ रकर यांच्याकडे असणाऱ्या जमेच्या बाजू
-2011 पासून शिवरत्न प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सातत्याने
14 वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग
-आपल्या प्रभागातील नाल्याचे सुशोभीकरण करण्यासाठी
पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करुन प्रत्यक्षात कामाला
सुरुवात करुन या भागाला प्रदूषणमुक्त करण्यात विशेष पुढाकार
-सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध 4बी.बी.ए.,एम.बी.ए.(एच.आर.) पर्यंतचे उच्चशिक्षण घेऊ नही
पाय मात्र जमीनीवर, माणूसकीप्रधान स्वभाव
-आजपर्यंत आपल्या भागातील 450 भाविकांना तुळजापूर,अक्कलकोट, पंढरपूर या धार्मिक सहलीच्या माध्यमातून स्व.खर्चातून देवदर्शन घडवले अजूनही सहली सुरुच आहेत
1) भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनीही हजेरी लावली होती
2) तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपुर ट्रिपचे आयोजन करुन संतोष
थेऊरकर यांनी आजपर्यंत दोन टप्प्यात सुमारे 450 भाविकांना स्वखर्चातून देवदर्शन घडविले यावेळी भाविकांसमवेत थेऊरकर स्वत: या सहलीत सहभागी होत सर्वांमध्ये मिसळून जातात






