शिक्रापूर : माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी शिक्रापूर ग्रामस्थांच्या सहभागातून पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर चाकण चौकात होणाऱ्या वाहतुक कोंडीच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्यानंतर तातडीने 10 ऑक्टोबरला बांधकाम खात्याचे प्रमुख अधिकारी, पीएमआरडीएचे प्रमुख अधिकारी, पोलिस अधिकारी, आगारप्रमुख या सवांची कृती समितीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत महत्वाची बैठक पार पडली, यात वाहतुक कोंडी न होण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या तसेच बांधकाम विभागाकडून या रस्त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, चाकण चौकात रस्त्यावर थांबणाऱ्या एस.टी.बसेस, अतिक्रमणाकडे झालेले दुर्लक्ष अशी असंख्य कारणे समोर ठेवत त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरल्यानंतर अखेर सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे साहजिकच आता पुणे-अहिल्यानगर रस्ता वाहतुक कोंडीतून मोकळा श्वास घेईल असा आशावाद निर्माण झाला आहे.







